24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये हॉटेलला आग, २७ जणांना बाहेर काढले

गुजरातमध्ये हॉटेलला आग, २७ जणांना बाहेर काढले

एकमत ऑनलाईन

जामनगर : गुजरातमधील जामनगर-खंभलिया महामार्गावर सिक्का पाटियाजवळील हॉटेल एलेंटोला आग लागली आहे. आग एवढी भीषण होती की काही वेळातच ती संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली. हॉटेलमध्ये २७ हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर बचाव पथकाने अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले.

जामनगरचे एसपी प्रेमसुख दिलू यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये 36 खोल्या आणि रेस्टॉरंट आहे. १८ खोल्यांमध्ये २७ पाहुणे होते. आगीची माहिती मिळताच प्रशासनाने रिलायन्स, जीएसएफसी आणि जामनगर अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी पाठवल्या आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. यात कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या ३ जणांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग
आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, स्थानिकांनी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले आहे. अधिकृतपणे किंवा हॉटेल व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. पोलिस-प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

२५ हून अधिक लोक जखमी
घटनेत २५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जामनगर जीजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. तिवारी यांनी सांगितले की, या हॉटेलमधून सुमारे २५ लोकांना हॉस्पिटलमध्ये आणले जात असल्याची माहिती त्यांनी मिळाली आहे. रुग्णालयात जखमींवर उपचाराची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या