24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारतातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने उतार कसा झाला? जगभरातील वैज्ञानिक संभ्रमात

भारतातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने उतार कसा झाला? जगभरातील वैज्ञानिक संभ्रमात

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत भारतात दररोज सुमारे एक लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. हाच काळ होता जेव्हा या प्रकरणात भारत अमेरिकेला मागे टाकण्याच्या मार्गावर होता. रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरलेली होती. भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेली होती. तथापि, गेल्या चार महिन्यांत भारतातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे आणि आता भारतात कोरोना संसर्गाची केवळ १०,००० प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत.

गेल्या महिन्यात आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की २६ जानेवारी रोजी भारतात कोरोनाचे केवळ ९,१०० नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठ महिन्यांतील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. त्याशिवाय ७ फेब्रुवारी रोजी केवळ ११,८३१ प्रकरणे नोंदविण्यात आली. जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचे हेल्थ इकॉनॉमिस्ट जिष्णू दास म्हणतात, भारतात ना कसलीही चाचणी कमी झाली आहे की धोक्याला कमी लेखले गेले नाही, मग हा वेगवान पसरणारा आजार अचानक कसा नाहीसा झाला? रुग्णालयात आयसीयूचा वापरही कमी झाला आहे. प्रत्येक गोष्ट हेच दर्शवते की आता भारतात रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

वैज्ञानिकांसाठी रहस्य
हे अगदी वैज्ञानिकांसाठी देखील एक रहस्य आहे. ते भारतात कोरोना बळींच्या संख्येत अचानक होणा-या घटविषयी ते चौकशी करत आहेत. अर्थात यामागे सार्वजनिक आरोग्य सेवा उपाय कार्यरत आहेत. चाचणी संख्या वाढवण्यात आली आहे. परिस्थिती बिकट होण्यापूर्वी लोक रुग्णालयात जात आहेत, त्या मुळे मृतांचा आकडा देखील खाली आला आहे. पण हे आत्तापर्यंत एक रहस्यच आहे.

मास्क घालणे आवश्यक
मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या नगरपालिकांमध्ये पोलिस प्रशासनाने मास्क न घातलेल्यांकडून २०० रुपये दंड आकारण्यास सुरवात केली. जे लोक घराबाहेर पडले आहेत, जॉगर्स, बीच चालणारे किंवा ओपन एअर रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांनाही हा दंड तितकाच लागू होता. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने फोनद्वारे हा अभ्यास केला.

उष्णता आणि आर्द्रता
देशातील बहुतेक भाग गरम आणि दमट आहेत. श्वसन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारताचे हवामान उपयुक्त आहे. तथापि, काही गोष्टी त्याउलट देखील आहेत. प्लस वन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शेकडो नागरिकांच्या संशोधनाचा आढावा घेताना असे दिसून आले आहे, की कोरोनाचा प्रभाव गरम आणि दमट ठिकाणी कमी आहे. उबदार तापमान आणि आर्द्रता एकत्रितपणे कोरोना विषाणूचा परिणाम कमी करते.

रोगांशी लढण्याची क्षमता
भारतात आधीपासूनच मलेरिया, डेंग्यू ताप, टायफॉइड, हिपॅटायटीस आणि कॉलरासारखे आजार आहेत. देशातील कोट्यवधी लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी देखील मिळत नाही. स्वच्छता आणि आरोग्यदायी अन्नाची कमतरता आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत राहणा-या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक क्षमतेची असते.

भारताने तज्ज्ञांना चुकीचे सिद्ध केले
साथीच्या काळात भारताचे हवामान आणि लोकसंख्याशास्त्र बदलले नाही. सप्टेंबरमध्ये ही प्रकरणे झपाट्याने वाढली, परंतु त्यानंतर घटतच राहिले. अशा वेळी कोरोना बळी पडलेल्यांची संख्या नोंदवली गेली होती, तसेच ती आणखी वाढेल, असे तज्ज्ञांनी म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये दिवाळी आणि दुर्गापूजनाच्या वेळी कोरोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, हा आकडा सातत्याने उतरत राहिला आहे.

लोकशाहीची मानके सुरक्षित ठेवा; अमेरिकन खासदारांचा भारताला सल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या