26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये प्रचंड हानी

केरळमध्ये प्रचंड हानी

एकमत ऑनलाईन

तिरुवअनंतपुरम : मुसळधार पाऊस आणि त्यातून बसलेल्या पुराच्या तडाख्यात केरळमध्ये प्रचंड हानी झाली असून, दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. यात अनेक घरे गाडले गेले असून, यात ब-याच लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे. दरम्यान, लष्कर आणि एडीआरएफच्या मदतीने मदत आणि बचावकार्य वेगात सुरू करण्यात आले असून, पूरग्रस्त आणि आपद्ग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

केरळातील अनेक जिल्ह्यांत अजूनही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात महापुराची परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी दरडीदेखील कोसळत आहे. राज्यातील पटनमथीटाच्या खालच्या भागांत महापुराचा तडाखा बसला आहे. या भागांत एनडीआरएफची विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच या भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, केरळमधील पूरग्रस्त भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसामुळे निसर्गाच्या कहराला सामोरे जाणा-या केरळमधील अनेक जिल्ह्यांत मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना उधाण आले असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहने वाहून गेली. नदीच्या काठावरही मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या