25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeराष्ट्रीयदिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ-सत्येंद्र जैन

दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ-सत्येंद्र जैन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत ही आकडेवारी दररोज चार हजारांच्या वर गेली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे म्हणणे आहे की, काही दिवसांतच या प्रकरणांमध्ये वाढ होईल.कारण त्यांनी दिल्लीत कोरोना चाचणीचा वेग वाढविला आहे. आतापर्यंत कोरोना चाचणीचा वेग चार वेळा वाढविण्यात आला आहे.

सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत पुढील 10-15 दिवसात कोरोना रुग्णांच्या प्रकरणात वाढ दिसून येईल. कोरोनाची केलेली वेगवान तपासणी हे त्याचे कारण आहे. सरकारने कोरोनाचा तपास चार वेळा वाढविला आहे. यामुळे दिल्लीत कोरोना संक्रमण होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. ते म्हणाले की कोरोना स्क्रिनिंग वाढल्यास निरोगी लोकांपासून संक्रमित होण्यास मदत होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम होईल.

बुधवारी दिल्लीत कोरोनाचे 4473 नवीन रुग्ण आढळल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले. तर 62 हजार 553 लोकांची तपासणी झाली. त्यापैकी 7.15 टक्के लोक पॉजिटिव आढळले. गेल्या दहा दिवसांत मृत्यूचे प्रमाण ०.7 टक्के राहिले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीवर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन म्हणाले की, भारतातील कोविड रुग्णांचे सुधारण्याचे प्रमाण हे 78 ते 79 टक्के आहे. ते म्हणाले की, कोविड -१९ पासून मोठ्या प्रमाणात बऱ्या होणाऱ्या काही देशांमध्ये भारत आहे.

हर्षवर्धन म्हणाले की कोरोना विषाणूची एकूण संख्या जास्त असली तरी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रूग्णांची संख्या २० टक्क्यांहून कमी आहे. ते म्हणाले की, कोविड साथीच्या आजारामुळे भारतात बळी पडलेल्या लोकांची संख्या युरोपमधील बर्‍याच देशांपेक्षा कमी आहे. मंत्री म्हणाले की, अमेरिकेपेक्षा भारतात कोविड च्या संदर्भात अधिक चौकशी करण्याचा सरकार विचार करीत आहे.

श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशांची परिस्थितीही आव्हानात्मक-कारमेन रेनहार्ट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या