23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयमानवाधिकार आयोगाची चार राज्यांना नोटीस

मानवाधिकार आयोगाची चार राज्यांना नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या चार राज्यांना तसेच येथील प्रमुख पोलिस अधिका-यांना नोटीस पाठवली आहे. या राज्यांना आयोगाने शेतक-यांच्या आंदोलनाचा अहवाल मागितला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मते, त्यांना या राज्यांमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे नऊ हजारांहून अधिक उद्योग बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. ज्यामुळे लोक, रुग्ण, वृद्ध आणि दिव्यांग यांना ब-याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शेतक-यांच्या आंदोलनावर मानवाधिकार आयोगाने कडक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनामुळे लोकांना काही ठिकाणी घरे सोडण्याची परवानगी दिली जात नाही. याशिवाय, आंदोलनाच्या ठिकाणी करोना नियमांचे उल्लंघन केले जात आहे, अशा तक्रारी आल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. या चार राज्यांना आणि अधिका-यांना नोटीस देण्याव्यतिरिक्त, आयोगाने उद्योग-धंद्यावर आंदोलनाचा काय परिणाम होतो. यासंदर्भात आर्थिक विकास संस्थेकडून १० ऑक्टोबरपर्यंत अहवाल मागितला आहे. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गृहमंत्रालयाकडून या आंदोलनात करोना नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे अहवाल मागितला आहे.

सर्व्हेक्षणासाठी टीम तयार करा
दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क आणि दिल्ली विद्यापीठाला सर्वेक्षण करण्यासाठी टीम नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. ही टीम शेतक-यांच्या आंदोलनामुळे उपजीविकेवर, लोकांच्या जीवनावर, वृद्धांवर झालेल्या परिणामांचे मूल्यांकन करुन एक अहवाल सादर करेल, असे देखील मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या