24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीय'कोव्हीशिल्ड' लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक

‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक

एकमत ऑनलाईन

पुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या ‘कोव्हीशिल्ड’या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4 जणांचे अहवाल संध्याकाळी उशीरा समाधानकारक आले. त्यामुळे त्यांना शुक्रवारी (दि. 25) सकाळी लस देण्यात येणार असल्याची माहिती बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हीशिल्ड या लसीच्या चाचणीला सोमवारपासून प्रारंभ होणार होता. परंतु, ज्या स्वयंसेवकांची या लसीच्या चाचणीसाठी निवड करण्यात आली. त्यांच्या काही निकषांसाठी सोमवारी ससून, भारती तसेच केईएम रुग्णालयात स्वयंसेवकांच्या चाचण्या करण्यात आल्या.

त्यांच्या चाचण्यांचे अहवाल काल उशिरा सायंकाळी आले. त्यामुळे बुधवारी तिन्ही रुग्णालयात कोणत्याही स्वयंसेवकांना लस दिली नसल्याचे सांगण्यात आले. बुधवारी (दि. 23) भारती रुग्णालयातील एका स्वयंसेवकांला लस टोचण्यात आली आहे.

ससून रुग्णालयात आतापर्यंत 17 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सात जणांचे अहवाल आले असून, तीन जणांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. तर अन्य चौघांना कोणताही त्रास किंवा लक्षणे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना उद्या लस देण्यात येणार असे डॉ. मुरलीधर तांबे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या