26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeराष्ट्रीयओडिशातील रुग्णालयात कोवॅक्सिन च्या मानवी चाचण्या सुरू

ओडिशातील रुग्णालयात कोवॅक्सिन च्या मानवी चाचण्या सुरू

एकमत ऑनलाईन

ओडिशा : कोवॅक्सिन या देशातील नव्या कोरोना लसीचे सोमवारपासून एका संस्थेमध्ये मानवी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. याबाबतची माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR)ने निवडलेल्या १२ केंद्रांपैकी एक असलेल्या आयुर्विज्ञान संस्था आणि एसयूएम रुग्णालयमध्ये बहुप्रतिक्षित बीबीवी १५२ कोविड-१९ कोवॅक्सिनची चाचणी सुरू झाली आहे. संस्थेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात या प्रक्रियेसाठी १२ केंद्रांची निवड करण्यात आली आहे.

चाचणी प्रक्रियेचे प्रधान संशोधक डॉ. ई.वेंकट राव म्हणाले की, भारत बायोटेक द्वारा विकसित केलेल्या कोवॅक्सिन या महत्त्वपूर्ण चाचणीचा भाग होण्यासाठी स्वतः काही लोक पुढे आले होते. लस देण्यासाठी पुढे आलेल्या स्वयंसेवकांना कठीण चाचणी प्रकिया पार पाडावी लागली आणि त्यांना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) प्रोटोकॉल दिल्यानंतर लस दिली गेली.

दरम्यान देशात कोरोनामुळेबाधित झालेल्या रुग्णसंख्येबरोबरच मृतांची संख्याही वेगाने वाढत आहे. देशात आता संसर्ग झालेल्यांची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४९ हजार ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७०८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. हे मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा सर्वात जास्त आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत साधारण ४४५ आणि ५५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारताच्या तुलनेत मेक्सिकोमध्ये (७२९) कमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More  सहज : इम्यूनिटी अँड ह्यूमॅनिटी

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या