नवी दिल्ली : केरळमध्ये ‘बुरेवी’ चक्रीवादळ शुक्रवारपर्यंत धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानविभागाने केरळ व तामिळनाडू या राज्यांना याबाबत ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी २ हजारांहून अधिक मदत शिबिरे उघडली आहेत. तसेच ५ डिसेंबरपर्यंत समुद्रात मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत बातचित केली असून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बुरेवी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन, १७५ कुटुंबांतील ६९७ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच २ हजार ४८९ शिबिरांचे आयोजन केले आहे. राज्यात एनडीआरएफच्या ८ टीम दाखल झाल्या आहेत. एअरफोर्स आणि नेव्ही रेस्कू आॅपरेशन्स, तसेच बचावकार्यासाठी तयार आहेत, असेही विजयन सांगितले.
शेतकरी आंदोलनावर भाजपनेत्यांकडून कट असल्याची टीका