नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळचा वेग वाढला आहे. निवार चक्रीवादळ बुधवारी संध्याकाळी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या किना-यावर धडकणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली असून ताशी १०० ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
वादळाचा सामना करण्यासाठी तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशात बचाव दलाची १२०० जवान तैनात केली आहेत. यासोबतच आणखी ८०० जवानांना कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १२ गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच काही रेल्वे गाड्यार रद्द केल्या आहेत.बंगालच्या उपसागराच्या तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किना-याजवळ तटरक्षक दलाची ८ जहाजे आणि २ विमाने तैनात केली आहेत.
निवार वादळाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन