23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयपत्नीच्या हत्येचा पतीवर आरोप; १ वर्षांनी पत्नी जिवंत सापडली

पत्नीच्या हत्येचा पतीवर आरोप; १ वर्षांनी पत्नी जिवंत सापडली

एकमत ऑनलाईन

बागपत : उत्तर प्रदेशातील बागपत येथे १ वर्षापूर्वी ज्या महिलेच्या हत्येच्या खटल्यात माहेरच्या लोकांनी पतीविरोधात बालैनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु हीच महिला गाझियाबादच्या लोनी परिसरात प्रियकरासोबत राहत असल्याचे आढळले आहे. कोर्ट मॅरेज करून महिला प्रियकरासोबत संसार थाटत होती. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

१ वर्षापूर्वी बालैनी परिसरातील सोरखा गावातील काळूराम यांनी मे २०२१ मध्ये बहीण पूजाच्या हत्येच्या आरोपाखाली जावई बिजेंद्र यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिलेचा पती बिजेंद्रने अटकेविरोधात कोर्टाकडून स्टे आणला. ब्रिजेशने पोलिसांसह मिळून पूजाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. या शोधात ढिकौली येथील प्रियकरासोबत कोर्ट मॅरेज करून लोनी इथे राहत असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या