22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्राइमपतीने कापला पत्नीचा हात ; आरोपी फरार

पतीने कापला पत्नीचा हात ; आरोपी फरार

एकमत ऑनलाईन

कोलकाता : सरकारी नोकरी मिळावी म्हणून प्रत्येकजण जिवाचं रान करताना आपण पाहिले आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये याच्या अगदी उलट आणि धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पत्नीला सरकारी नोकरी करता येऊ नये यासाठी पतीनेच चक्क तिचा हात कापल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव आहे.आरोपी पतीने पत्नीचा चक्क मनगटातून हात कापला आहे. त्यानंतर पत्नीला स्वत: रुग्णालयात दाखल करून तो फरार झाला. पीडित महिलेचे नाव रेणू खातून असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शेर मोहम्मद पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राम येथील रहिवासी असून त्याने पत्नी रेणू खातूनचा उजवा हात मनगटातून कापला. क्रूर हल्ल्यानंतर तो स्वत:च पत्नीला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेला.

पण डॉक्टरांना हात पुन्हा जोडता येणार नाही याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती. कारण, कापलेला काही भाग त्याने घरातच लपवून ठेवण्याचे क्रूरकृत्य केले होते.

स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले की, रेणू नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती आणि ती दुर्गापूर जवळच्या औद्योगिक नगरात एका खासगी रुग्णालयात सहायक म्हणून काम करत होती. नुकतेच तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू होण्यासाठी नियुक्तीपत्र मिळाले. पण त्यामुळे पती शेर अस्वस्थ झाला होता. तो स्वत: बेरोजगार होता, त्यामुळे सरकारी नोकरी मिळाल्याने पत्नी सोडून देईल अशी भीती त्याच्या मनात होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या