22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयमी मोदींच्या धोरणांवर टीका करतो

मी मोदींच्या धोरणांवर टीका करतो

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नुकतेच एक मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधींप्रमाणं मी वैयक्तिक हल्ले करत नाही. मी ७ वर्षे संसदेत नरेंद्र मोदींसमोर बसून त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. पण राहुल गांधींप्रमाणे मी कोणाला शिव्या देत नाही. मी धोरणांवर टीका करतो असे स्पष्ट मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुलाम नबी आझाद यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर केली असून वातावरणात बदल होत असल्याचे सांगितले. रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. वातावरणात बदल झाला असून आता हे लोक भाजपचे निष्ठावान सैनिक बनले आहेत असे त्यांनी नमूद केले आहे. आझाद यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की जी २३ च्या स्थापनेनंतर राहुल गांधींनी माझे नाव भाजपशी जोडण्यास सुरुवात केली. आम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहिल्यावर ते संतप्त झाले आणि त्यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून लिहिल्याचा खोटा प्रचार सुरू केला. पंतप्रधान वेडे नाहीत, जे आम्हाला काँग्रेस मजबूत करण्यासाठी पत्र लिहायला सांगतील, अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केली.

माझ्याकडे काळा पैसा नाही
गुलाम नबी आझाद यांना कोणीही आदेश देऊ शकत नाही. माझ्यावर एकही केस नाही किंवा एकही एफआयआर नाही. माझ्याकडे कोणताही काळा पैसा नाही, त्यामुळं मी कशाला घाबरू असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले. गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन करणार आहेत. रविवारी एका सभेत ते म्हणाले, येत्या १० दिवसांत आम्ही राजकीय पक्ष स्थापन करू. मला माहित आहे की काय होऊ शकते आणि काय नाही असेही ते म्हणालेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या