भागलपूर : मोहन भागवत यांनी ब्राह्मणांवर केलेल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. ते भागलपूरमध्ये म्हणाले की, मी कधीही ब्राह्मण हा शब्द वापरला नाही. मी म्हणालो पंडित, तो कोणत्याही जातीचा असू शकतो जो बुद्धिमान असतो त्याला पंडित म्हणतात.
मोहन भागवत यांनी शुक्रवारी भागलपूरमध्ये स्वयंसेवकांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वादाशी संबंधित अनावश्यक विषयांवर चर्चा करण्याऐवजी राष्ट्र उभारणीवर बोला असा सल्ला दिला. ते खूप चांगले होईल असे ते म्हणाले. देशभरात रामचरितमानसच्या चौपईवरून वाद सुरू असताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले होते. रविवारी मुंबईत संत रविदास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, जात ही देवाने निर्माण केलेली नाही, जात पंडितांनी निर्माण केली आहे, जे चुकीचे आहे. देवासाठी आपण सर्व एक आहोत. आधी आपल्या समाजात फूट पाडून देशात हल्ले झाले, मग त्याचा फायदा बाहेरच्या लोकांनी घेतला. आपल्या समाजात फूट पाडून लोकांनी नेहमीच फायदा घेतला आहे.
फूट पाडून बाहेरच्या लोकांना फायदा
कैक वर्षांपूर्वी देशात आक्रमणे झाली, मग आमच्यात फूट पाडून बाहेरच्या लोकांनी फायदा घेतला. नाहीतर आमच्याकडे बघायची ंिहमत कोणाची नव्हती. याला कोणीही जबाबदार नाही. समाजातील आपुलकी संपली की स्वार्थ आपोआप मोठा होतो.