21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयजनतेचे दु:ख मला समजतेय; पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न

जनतेचे दु:ख मला समजतेय; पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि़ १४ मे रोजी संवाद साधला. नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातल्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

१०० वर्षांनंतर अशी भयानक साथीच्या आजाराची परिस्थिती जगावर उद्भवली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. अनेक लोक या कोरोनाच्या संकटातून जात आहेत. लोक ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहेत, त्याची जाणीव मला देखील आहे. जनतेचे दु:ख मला समजत आहे, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींनी देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यासोबतच नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लस घेतली तरीही मास्क वापरणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात आत्तापर्यंत १८ कोटी लोकांनी लस घेतल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

किसान निधी शेतक-याच्या खात्यावर वर्ग
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देशभरातील ९.५ कोटी शेतक-यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.

‘स्पुटनिक व्ही’च्या लसीकरणास प्रारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या