23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय गळा कापून टाकेन, पण भाजपसमोर झुकणार नाही - ममता बॅनर्जी

गळा कापून टाकेन, पण भाजपसमोर झुकणार नाही – ममता बॅनर्जी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये शाब्दिक आव्हाने सुरु झाली आहेत. हुगळी येथे सोमवारी झालेल्या प्रचारसभेत बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. एकवेळ मी स्वत:चा गळा कापून टाकेन; पण भाजपपुढे झुकणार नाही,अशी प्रतिज्ञाच बॅनर्जी यांनी केली आहे.

सोमवारी ममता बॅनर्जी यांची हुगळी येथे सभा पार पडली. सभेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. २३ जानेवारीला व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती समारोहात उपस्थित लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी भाषण करण्यास नकार दिला होता. त्यावर ममता यांनी सोमवारी प्रतिक्रिया दिली. त्या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या समोर माझा अपमान केला. मी बंदुकीवर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपने नेताजी आणि बंगालचा अपमान केला आहे’, अशा शब्दात भाजपवर त्यांनी निशाणा साधला आहे.

जर त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयजयकार केला असता तर मी त्यांना सलाम केला असता. पण तुम्ही मला बंदुकीच्या इशाºयावर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कसे प्रत्युत्तर द्यायचे हे मला ठाऊक आहे. मी गळा कापून टाकेन पण भाजपसमोर झुकणार नाही’, असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला.

अर्णबनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या