नवी दिल्ली : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेचा (आयसीएसई) रविवारी सायंकाळी आयएससी इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. १ लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहात होते.
महाराष्ट्राचा आयसीएसई बारावी बोर्डाचा निकाल ९९.७६ टक्के लागला आहे. यात पुन्हा मुलीने बाजी मारली आहे. आयसीएसई १२ वी बोर्ड परीक्षेत ९९.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ९९.२६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.