23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीय१ रुपयात इडली, आजीबाईंच्या तीस वर्षांच्या सेवेला मुख्यमंत्र्यांचा सलाम

१ रुपयात इडली, आजीबाईंच्या तीस वर्षांच्या सेवेला मुख्यमंत्र्यांचा सलाम

एकमत ऑनलाईन

मदुराई : गेल्या ३० वर्षांपासून केवळ १ रुपयात इडली विक्रीचा व्यवसाय करणा-या ८७ वर्षीय आजीबाईंचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते गुरुवारी गौरव करण्यात आला. या तीस वर्षांच्या काळात महागाईत प्रचंड वाढ झाली तरीही त्यांनी आपल्या इडलीच्या किंमतीत बदल केलेला नाही.

एम कमलथल असे या आजीबाईंचं नाव असून कोईम्बतूर इथे आपल्या घरवजा दुकानात ते इडली विक्रीचा व्यवसाय करतात. या ठिकाणी जे लोक बाहेरगावहून येतात ज्यांना घरी जण्याचा पर्याय नसतो तसेच त्यांना स्वत:साठी जेवण बनवणे शक्य नसते अशा लोकांसाठी त्यांनी १ रुपयात इडली देतात.

इडलीसाठी लागणारी सामग्री जसं की, उडीद दाळ, भाजक्या डाळी, मिरची याच्या किंमतीत गेल्या तीस वर्षात मोठी वाढ झालेली असतानाही कमलथल या १ रुपयालाच इडली विकतात. दररोज त्या सुमारे ३०० लोकांना इडली विकतात. कोरोनाच्या काळातही सर्व महागलेले असताना त्यांनी १ रुपयातच इडली विकली. या काळात आपल्या घरी इडलीसाठी रांग लागलेली असायची तेव्हा त्यांना सोशल डिस्टंंिसगचे पालन करायला लावून त्यांनी आपला व्यवसाय सुरु ठेवला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या