चाईबासा : नक्षल्यांविरोधात कोल्हानच्या जंगलात सुरू असलेल्या अभियानादरम्यान शनिवारी सुरक्षा दलाला फार मोठे यश मिळाले आहे. या जंगलात नक्षल्यांनी पेरून ठेवलेले १० आयईडी बॉम्बसह ३ नक्षल समर्थकांना अटक केली.
१० डिसेंबरपासूनच हे नक्षलविरोधात अभियान सुरू झालेले आहे. शनिवारी चाईबासा पोलिस ठाण्याअंतर्गत संयुक्त अभियान सुरू असताना ईचाहातू येथून इचागोडाकडे जाणा-या रस्त्यावर आयईडी स्फोटके जप्त केली.