24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयभटक्या कुत्र्याने चावा घेतला तर त्याला खायला घालणारा जबाबदार

भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर त्याला खायला घालणारा जबाबदार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जर भटक्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला चावा घेतला तर रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणा-याला जबाबदार धरले जाईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय देताना पाळीव प्राण्यांचे हक्क आणि मानवाच्या सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे असे स्पष्टीकरण कोर्टाने दिले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने भर दिला असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास सदर रूग्णाच्या उपचाराचा खर्चही भटक्या कुत्र्यांना खायला देणा-यांंनी उचलावा असे न्यायालयाने पुढे म्हटले आहे. केरळातून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि जे. महेश्वरी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती खन्ना यांनी आपण श्वानप्रेमी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जे लोकं भटक्या कुर्त्यांना खायला घालतात ते लोक अशा कुत्र्यावर लक्ष ठेवू शकतात असेही न्यायमुर्तींनी सांगितले.

भटक्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्यास त्या व्यक्तीच्या उपचाराची सर्व जबाबदारी त्याला खायला घालणा-या व्यक्तीची असेल कारण कुत्र्याला खायला घालणा-या व्यक्ती आणि हल्ला झालेल्या व्यक्तींमध्ये समतोल राखणे गरजेचे आहे असे मत न्यायमुर्ती खन्ना यांनी व्यक्त केले आहे. तर भटक्या कुत्र्याची समस्या आपण मान्य करायला पाहिजे असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. केरळ सरकारची बाजू मांडणारे अधिवक्ता व्ही. के. बिजू यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, ऑगस्टमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शाळकरी मुले आणि महिलांचा सामावेश आहे. त्याचबरोबर वकिलाने केरळमधील एका १२ वर्षीय मुलीचा कुत्र्याने चावा घेतल्यामुळे झालेला मृत्यूचा संदर्भ दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या