24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमनोरंजनसीपीआर दिला असता तर केकेंचा जीव वाचला असता

सीपीआर दिला असता तर केकेंचा जीव वाचला असता

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका लाईव्ह कॉन्सर्टनंतर गायक केके यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले. केके यांच्या निधनाची मोठी माहिती समोर आली आहे, केकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे.

प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जर त्यांना वेळेवर आवश्यक उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. केकेंना सीपीआर दिला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असे अहवालात म्हटले आहे. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

केके यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित
कोलकाता येथील नजरुल मंच येथे गायक केके यांचा कॉन्सर्ट पार पडला. पण आता कॉलेज फेस्टवर बंदी घातली जाऊ शकते. कोलकाता येथील गुरुदास कॉलेजने मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या फेस्टमधील खराब क्राऊड मॅनेजमेंटनंतर आता या संदर्भात विचार केला जात आहे.

केके यांच्या मृत्यूनंतर कॉन्सर्टमध्ये केलेल्या खराब व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोलकाता मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या महासंचालक सुप्रियो मैती यांच्या नेतृत्वाखालील केएमडीएच्या टीमने बुधवारी दुपारी नजरुल मंचच्या पायाभूत सुविधांची पाहणी केली. आता ही टीम तिथे कॉलेज फेस्टवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.

कॉन्सर्टच्या वेळी ६,००० लोकांचा जमाव
रिपोर्टनुसार, नझरूल स्टेजची क्षमता २,७०० ते ३,००० पर्यंत मर्यादित आहे, परंतु कॉन्सर्टच्या वेळी, ६,००० लोकांचा जमाव तिथे होता, तिथे बरेच लोक पाय-यांवर बसले होते. तर काही लोक हे उभे राहून कॉन्सर्ट पाहात होते. केएमडीएच्या टीमचे असे मत आहे की गर्दीमुळे एअर कंडिशनिंग मशिन्सचा प्रभाव कमी झाला आणि त्यामुळे केकेंना गुदमरल्यासारखे झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या