कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सर्वच स्टार प्रचारकांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जींचे कट्टर वैरी व भाजपचे नंदीग्राममधील उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली असून दीदींची सत्ता पुन्हा आल्यास बंगालची स्थिती काश्मीरसारखी भयानक होईल, असा दावा केला आहे.
भाजपकडून ममता बॅनर्जी यांच्यावर प्रारंभीपासूनच मुस्लिमांच्या तुष्टीकरण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. बांगला देशातील रोहिंग्या मुसलमानांना ममतांनी बंगालमध्ये आश्रय दिला असून त्यांच्यामुळे पश्चिम बंगालची शांतता व संस्कृती धोक्यात आल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. सुवेुदू अधिकारी यांनीही शनिवारी मुहलपारा व बहारा येथे सभा घेतल्या. त्यात त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. रोहिंग्या मुसलमानांची संख्या बंगालमध्ये वाढत असून त्यांना पोसायचे काम दीदी जाणीवपुर्वक करीत असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला. ममतादीदींच्या मतांसाठी मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या राजकारणामुळे बंगालची सांस्कृतिक ओळखच संकटात आली आहे. शांतता पुर्ण व विविध पुजा,सण,उत्सव साजरे करण्याची मोठी परंपरा असलेल्या बंगालमध्ये सामाजिक शांतता संपुष्टात आणण्याचा प्रकार घुसखोर मुस्लिमांकडून होत आहे. तृणमुलच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात जातीयवादी मुस्लिम कार्यकर्त्यांचा भरणा असून त्यांच्याकडून महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.जर पुन्हा दीदींची सत्ता आली तर ही स्थिती आणखी चिघळणार असून बंगाल म्हणजे दुसरे काश्मीर बनेल ,असा इशाराच अधिकारी यांनी दिला.
अधिकारी हे आधी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र काही महिन्यांपुर्वी त्यांनी मंत्रीपदासह आमदारकीचाही राजाीनामा देत ममतांना सोडचिठ्ठी दिली होती. आता ते नंदीग्राम या त्यांच्या परंपरागत मतदारसंघातून निवडणुक लढवित असून या परिरातील अनेक मतदारसंघांवर त्यांचा निर्णयात्मक प्रभाव राहिला आहे. अधिकारी यांच्या पक्षबदलामुळे ममता बॅनर्जींची सत्ता कधी नव्हे ती धोक्यात आली आहे. दुसरीकडे बॅनर्जीही अधिकारी यांना त्यांच्या गद्दारीची शिक्षा द्यायचीच असा ठाम इरादा करुन नंदीग्राममधूनच रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी व सुवेंदू अधिकारी यांच्यातील सामन्याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
धर्माबाद ते मनूर रस्त्यावर खड्डाराज