30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय धोरण योग्य व हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलते

धोरण योग्य व हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलते

एकमत ऑनलाईन

दिसपूर : आसाम व पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चालू महिन्यात तिस-यांदा पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. त्यापार्श्वभुमीवर आसाममधील दिसपूर येथील सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. नीती आणि नियत चांगली असेल, तर नियती बदलते, असे म्हणत आसामच्या मागासलेपणासाठी विरोधी पक्ष काँग्रेसला दोषी ठरवले आहे.

आसाममध्ये काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये होते. यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षात आसाममधील भाजपसरकारच्या कामगिरीचे कौतूक करीत अपुर्ण विकासकामांसाठी काँग्रेसला दोषी ठरवले. पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहेत. दोघांचीही धोरणे चांगली व ती राबवण्यासाठी वृत्ती चांगली असल्यानेच आसामचा विकास होत असल्याचा दावाच त्यांनी केला. मात्र पश्चिम बंगालमध्ये केंद्राच्या योजनांना तृणमुल काँग्रेसचे सरकार आडकाठी करीत असल्यानेच त्या राज्याचा विकास अडल्याचा अनुल्लेखाने दावा केला.

नागरिकांना रोजगारवाढीचे आश्वासन
दशकांपासून राज्य करणा-यांनी दिसपूरला दिल्लीपासून नेहमीच दूर ठेवले. त्यामुळे आसामचे मोठे नुकसान झाले. मात्र, दिल्ली आता दिसपूरसाठी दूर राहिलेली नाही. आसामच्या जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. लोकार्पण केलेल्या विविध प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे स्वप्नही त्यांनी आसामच्या नागरिकांना दाखविले.

 

लव जिहादकडे केरळ सरकारचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या