24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयजर महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही

जर महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही

एकमत ऑनलाईन

कोच्ची : जर महिलेने लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे कपडे परिधान केले असतील तर आरोपीवर प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी टिपण्णी केरळमधील एका स्थानिक कोर्टाने केली आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिव्हिक चंद्रन यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना कोर्टाने ही टिपण्णी केली आहे.

चंद्रन यांनी यासंदर्भात तक्रारदाराचे फोटो आपल्या याचिकेसोबत कोर्टात सादर केले होते. त्यावरून कोर्टाने त्यांना १२ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला. तत्पूर्वी २ ऑगस्ट त्यांच्यावर दाखल असलेल्या दुस-या लैंगिक छळाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला होता. दरम्यान, तक्रारदार महिलेच्या फोटोचा संदर्भ देत कोर्टाने म्हटले की, महिलेने असे कपडे परिधान केले आहेत. ज्यामुळे एखाद्यामध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. त्यामुळे सेक्शन ३५४ अ नुसार प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

महिलेची खोटी तक्रार?
चंद्रन यांनी आरोप केला होता की, महिलेने आपल्याविरोधात खोटी तक्रार केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये घडलेल्या कथीत घटनेचा संदर्भ देत चंद्रन म्हणाले, कार्यक्रमात तक्रारदार तिच्या प्रियकरासह इतर अनेकांची उपस्थिती होती पण इथे उपस्थित असलेल्या एकानेही आपल्याविरोधात अशी तक्रार केली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या