30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयचीनचा तिरस्कार असेल तर आधी मेड इन चायना 'स्टॅट्यू ऑफ युनिटी' हटवावा

चीनचा तिरस्कार असेल तर आधी मेड इन चायना ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ हटवावा

एकमत ऑनलाईन

गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी

अहमदाबाद : पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात चीनकडून सुरु असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांमध्ये सध्या चीनविरोधी भावना जोर धरु लागली आहे. त्याचबरोबर देशवासियांकडून चिनी सामानांवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच आता गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करत भाजपवर निशाणा साधत, जर खरचं चिनी सामानाचा भाजपला तिरस्कार वाटत असेल, तर आधी त्यांनी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे, असे म्हटले आहे.

चीन हा आपला मित्र नसून शत्रू आहे. भाजपला जर चीनचा खरच विरोध करायचा असेल तर त्यांनी सर्वात आधी स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवावा, कारण तो चायना मेड आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी, असं छोटू वसावा अहमदाबाद मिररशी बोलताना म्हटले आहे. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

विकासाच्या नावाखाली केवाडियामधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी गुजरात सरकार बळजबरी करत असल्याचा आरोप छोटू वसावा यांनी केला. केवाडियाच्या परिसरातील ६-७ गावांमधील जवळपास २५ हजार हेक्टर जमीन बळजबरी ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या परिसरातील जमीन अमेरिकी आणि चिनी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वसावा यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदानापासून दूर राहून गुजरातमधील तीन भाजप उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.

Read More  खासगी कंपन्यांवरही हवी चिनी तंत्रज्ञान वापराला बंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या