26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home राष्ट्रीय लसीवर विश्वास नसल्यास पाकिस्तानात जा

लसीवर विश्वास नसल्यास पाकिस्तानात जा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र लसीसंदर्भात मुस्लिम समाजाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदाराने केले आहे. उत्तर प्रदेशातील सरधानाचे आमदार संगीत सिंह सोम यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना लसीकरणावर उपस्थित केले जाणारे प्रश्न दुर्दैवी आहेत.

देशातील काही मुस्लिम बांधवांना कोरोना लसीवर विश्वास नाही. त्यांचा शास्त्रज्ञ, पोलीस आणि पंतप्रधानांवरही विश्वास नाही. त्यांना पाकिस्तान अधिक जवळचा वाटतो. कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे. मात्र, शास्त्रज्ञांच्या मेहनतीवर शंका घेऊ नये, असे सोम यांनी म्हटले आहे. कोरोना लसीवरुन विविध पक्ष्यांच्या नेत्यांकडून राजकारण केले जात असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपुर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोना लसीला भाजपची लस असल्याचे म्हटले होते.

भाजप आमदार महेंद्र दिलावर यांनीही वादग्रस्त विधान केले होते. काही मुस्लिम नेत्यांकडूनही लसीबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. लसींमध्ये डुकराची चरबी असल्याचा दावा करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यापार्श्वभुमीवर सोम यांनी हे वादग्रस्त विधान केल्याने वादात भर पडणार आहे.

पाकमध्ये दहशतवाद्यांना मिळते फाइव्ह स्टार सेवा – यूनोत भारताने केली पाकची पोलखोल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या