चम्फाई : आसाम रायफल्सच्या सेरछिप बटालियनने चम्फाई जिल्ह्यातील तलंगसम येथे कोट्यवधी रुपयांचे अवैध सिगरेट जप्त केले. या पथकाने आज १.५ कोटी रुपयांच्या अवैध सिगरेटचे ७० कार्टून जप्त केले. दरम्यान, एका व्यक्तीला अंमली पदार्थाच्या तस्करीवरून अटक केली.
गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने ही कारवाई केली. आसाम रायफल्स आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी संयुक्त अभियान राबविले आणि अवैध विदेशी सिगरेटचा पर्दाफाश केला.