30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय अवैज्ञानिक उत्पादनांच्या जाहिरातीवर आयएमएचा आक्षेप

अवैज्ञानिक उत्पादनांच्या जाहिरातीवर आयएमएचा आक्षेप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून पतंजलीच्या कोरोनिलची जाहिरात करण्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.याआधी, गेल्या वर्षी २३ जून रोजी करोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी कोरोनिल नावाचे एक इम्युनिटी बुस्टर अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध जाहीर करण्यात आले होते़ त्यावरून मोठा वाद झाल्यानंतर हे औषध केवळ कोरोनावर मात करू शकत नसल्याचे तसेच, हे औषध केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करेल, असे पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आले होते़

त्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीकडून कोरोनिल टॅबलेट नावाने दुसºयांदा हे आयुर्वेदिक औषध बाजारात आणले गेले आहे़ या औषधाला वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या निर्देशांनुसार, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून या औषधाला मंजुरी दिल्याचा दावा योगगुरु रामदेव बाबा यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु, संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकृत ट्विटमध्ये मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनावर उपचारासाठी कोणत्याही प्रकारच्या पारंपरिक औषधाच्या प्रभावाला मंजुरी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण डब्ल्यूएचओने दिले आहे़

कोरोनिलमुळे जगातील १५८ देशांना कोरोनाशी दोन हात करण्यात मदत मिळेल असा दावाही पतंजली आणि रामदेव बाबा यांच्याकडून करण्यात आला. यावेळी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रोजी औषधाच्या लॉन्चिंगसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते.

 

शंतनू मुळूक यांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या