22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयसुधरा; नाहीतर रामनाम सत्य

सुधरा; नाहीतर रामनाम सत्य

लव्हजिहादवरुन योगी संतप्त ; कडक कायदा करणार

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या लव्ह जिहाद च्या प्रकरणांना अत्यंत गंभीरतेने घेतल्याचे दिसत आहे. लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे सांगत योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सन्मानाशी खेळणा-यांचे आता राम नाम सत्य होईल असा गंभीर इशारा दिला आहे.

जौनपूर आणि देवरिया येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन केले जाऊ नये यासाठी सरकार देखील कडक निर्णय घेणार असून लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. जे लोक आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात,अशा लोकांना मी इशारा देत आहे की, जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.

ऑपरेशन शक्ती राबवणार
यावेळी योगींनी सांगितले की, आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत. त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणार आहोत. न्यायालयाचे आदेशाचे देखील पालन होणार व महिलांचा सन्मान देखील होणार आहे, हाच ऑपरेशन शक्तीचा उद्देश आहे.

जवळा येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा तातडीने शोध करावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या