नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांची एका महिलेसोबत फोन सेक्स करतानाची ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पत्रकार शाएद अली हैदर यांनी ही क्लिप दोन पार्टमध्ये प्रसिद्ध केली आहे.
व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप जुनी असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांनी या महिलेशी केलेल्या कथित संभाषणाचा दुसरी ऑडिओ क्लिप अलीकडच्या काळातील असल्याचे दिसते. यामध्ये इम्रान खान महिलेला जवळ येण्यास सांगत आहेत, जे ती सतत नाकारत असते. ही प्रक्रिया बराच काळ चालते. व्हायरल ऑडिओमध्येही महिला बोलताना ऐकू येते की इम्रान, तु माझ्यासाठी काय केलंस? मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. याच ऑडिओ क्लिपमध्येही महिला इम्रान खान यांना दुस-या दिवशी येण्यास सांगते.