23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयइम्रान प्रतापगडींना कॉंग्रेसची उमेदवारी

इम्रान प्रतापगडींना कॉंग्रेसची उमेदवारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रामधून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा उमेदवारी अर्ज उद्या भरण्यात येणार आहे. दरम्यान इम्रान प्रतापगडी हे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या जवळचे मानले जातात. तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्रात बाहेरचा उमेदवार दिल्याने कॉंग्रेसमधून नाराजी व्यक्त केल्याचे समजते. महाराष्ट्रात मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यासह इतर नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, ऐनवेळी बाहेरून उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त झाल्याचे समजते. मात्र, कॉंग्रेसकडे एका उमेदवाराला निवडून देण्याइतपत संख्याबळ आहे. या अगोदर ज्येष्ठ नेते चिदम्बरम यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या