25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय२०२४ मध्ये जनताच निर्णय घेईल

२०२४ मध्ये जनताच निर्णय घेईल

एकमत ऑनलाईन

पाटणा : मागच्या काही दिवसांत बिहारमध्ये जेडीयूचे (जनता दल युनायटेड) अध्यक्ष नितीश कुमार यांनी भाजपसोबतची आपली युती तोडत आरजेडीसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर जेडीयूचे अनेक आमदार भाजपच्या वाटेला गेले आहेत. जेडीयूला (राष्ट्रीय जनता दल)अरूणाचल प्रदेशमध्येही मोठा झटाका बसला होता. त्यानंतर मणिपूरमधील ६ पैकी पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता नितीश कुमार यांनी यावर भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

मणिपूरमधील जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या पाच आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, एक गोष्ट सिद्ध होतेय की लोक कशा प्रकारे काम करत आहेत. इतर पक्षांतील लोकांना आपल्या बाजूने आणने ही संविधानिक बाब आहे का? हे करणे योग्य आहे का? असे प्रश्न उपस्थित करत नितीश कुमार यांनी भाजपला इशारा दिला. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास २०२४ च्या निवडणुकीत देशातील जनतेचा निर्णय चांगलाच येईल. तेव्हा या लोकांना कळेल, असेही नितीश यांनी म्हटले आहे.

मणिपूरचे १० आमदार आमच्यासोबत
नितीश कुमार म्हणाले की, आता आम्ही एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर सर्व राज्यांतील पक्षाच्या लोकांशी चर्चा झाली. मणिपूरचे सहा आमदार १० तारखेनंतर बिहारमध्ये आले होते. त्यांनी आनंद व्यक्त केला होता. ते आमच्यासोबत होते. पण आता लक्षात घ्या काय होत आहे? ते (भाजप) कोणत्याही पक्षाच्या विजयी लोकांना आपल्या बाजूने कसे घेत आहेत, असेही नितीश कुमार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या