33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home राष्ट्रीय बिहारमध्ये रालोआचा नेता रविवारी ठरणार

बिहारमध्ये रालोआचा नेता रविवारी ठरणार

संरक्षणमंत्री उपस्थित राहणार: नितीशकुमारच मुख्यमंत्री होण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

पाटणा: बिहारमधील नवीन सरकारच्या नेत्याची निवड करण्यासाठी रालोआचे आमदारांची रविवारी दुपारी पाटण्यात बैठक होणार आहे. बैठकीत नितीशकुमार यांना एनडीएचे नेते म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. रविवारी पाटण्यात होणा-या रालोआ विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित असतील,अशी माहिती मिळत आहे.

भाजपने यापुर्वीच कोणला कितीही जागा मिळो, मुख्यमंत्री नितीशकुमारच राहतील असे स्पष्ट केल्याने मुख्यमंत्रीपदी नितिशकुमार यांचीच वर्णी लागण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे. दरम्यान शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला आहे. राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापनेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्यास सांगितले आहे.

आव्हान देण्याचा प्रयत्न करु नका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या