27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकानपूरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

कानपूरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

एकमत ऑनलाईन

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर दौ-याआधी कानपूरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली असून मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

पोलिसांनी काही स्थानिकांवर लाठीचार्ज केल्यानंतर यतीमखानाजवळील बेकनगंज भागात दोन गटांत हिंसाचाराला तोंड फुटले त्यानंतर दोन्ही समाजातील गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी २७ मे रोजी एका कार्यक्रमात प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आज अचानक मुस्मिम समाजातील नागरिक कानपूर येथील रत्यावर मोठ्या प्रमाणात एकत्र आले आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील वातावरण तणाणपूर्ण बनले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या