21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय मध्य प्रदेशात शेतक-यांना प्रत्येकी मिळणार ४ हजार

मध्य प्रदेशात शेतक-यांना प्रत्येकी मिळणार ४ हजार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मध्य प्रदेश सरकारने शेतक-यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री कृषि कल्याण योजनेसाठी १२ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील प्रत्येक शेतक-याला ४ हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या या निर्णयामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री कृषि कल्याण योजनेतंर्गत शेतक-यांच्या खात्यात वर्षातून दोनदा प्रत्येकी २००० रुपये जमा केले जातात. त्यासाठी संबंधित शेतक-याची पंतप्रधान कृषि योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नोंद असणे गरजेचे आहे. मध्य प्रदेशातील शेतक-यांना पीएम किसान योजनेशिवाय मुख्यमंत्री कृषि कल्याण योजनेचेही पैसे मिळतात.

केंद्र आणि राज्य सरकारमिळून १० हजारांची मदत
शिवराज चौहान सरकारने घोषणा केल्यानुसार ३० जानेवारीला मध्य प्रदेशातील शेतक-यांच्या खात्यात एकूण ४०० कोटी रुपये जमा केले जातील. मध्य प्रदेश सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही शेतक-यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेतंर्गत वर्षाला शेतक-यांना ६००० रुपये मिळतात. तर मुख्यमंत्री कृषि कल्याण योजनेतंर्गत वार्षिक ४००० रुपयांची मदत मिळते. अशाप्रकारे मध्य प्रदेशातील शेतक-यांना केंद्र व राज्य सरकारकडून १० हजारांची आर्थिक मदत दिली जाते.

पत्नीच्या रागातून १८ महिलांची हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या