22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशात आठवड्यातून एकदा दप्तराविना शाळा

मध्य प्रदेशात आठवड्यातून एकदा दप्तराविना शाळा

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे वर्गनिहाय वजन निश्चित करण्यात आले असून त्यामुळे त्यांना जड दप्तरांपासून दिलासा मिळणार आहे. या संदर्भात मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रमोद सिंह यांनी २९ ऑगस्ट रोजी एक आदेश जारी केला, जो तात्काळ लागू होणार आहे.

या व्यतिरिक्त सर्व सरकारी, निमसरकारी आणि अनुदानित शाळांचे विद्यार्थी आठवड्यातून एक दिवस दप्तराविना शाळेत जातील. त्या दिवशी व्यावसायिक कामाच्या अनुभवाशी संबंधित उपक्रम आयोजित केले जातील. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने, मनुष्यबळ विकास मंत्रालय, विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे जारी केलेल्या स्कूल बॅग पॉलिसी २०२० च्या अनुपालनाअंतर्गत राज्यातील शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ नाही
एका अधिका-याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशात सुमारे १.३० लाख शाळा आहेत, ज्यामध्ये सुमारे १५४ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. आदेशानुसार, इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ दिला जाणार नाही. जिल्हा शिक्षणाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील शाळांची निवड करून दर तीन महिन्यांनी शालेय दप्तरांचे वजन तपासतील आणि दप्तरांचे वजन विहित मर्यादेत असल्याची खात्री करतील असे सांगण्यात आले आहे.

निर्धारित पुस्तक संख्या असावी
विद्यार्थ्यांकडे राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निर्धारित केलेल्या पाठ्यपुस्तकांपेक्षा जास्त पुस्तके नसावीत. आदेशानुसार संगणक, नैतिक शिक्षण आणि सामान्य ज्ञानाचे वर्ग पुस्तकांशिवाय आयोजित करावेत. आरोग्य, शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि कला या विषयांचे वर्गही पुस्तकांशिवाय घेण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या