25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये एमएसपीची रक्कम बँक खात्यात जमा

पंजाबमध्ये एमएसपीची रक्कम बँक खात्यात जमा

एकमत ऑनलाईन

अमृतसर : पंजाबमध्ये किमान आधारभूत किमतीने (एमएसपी)खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत अनेक शेतक-यांना याचा लाभ मिळाला असून शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय अन्न महामंडळाने नुकतेच पंजाब सरकारला एमएसपीची रक्कम हस्तांतरित करता यावी,यासाठी शेतक-यांच्या जमिनींच्या नोंदी उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

पंजाबमध्ये निम्मे शेतकरी शेती करत आहेत परंतु ते जमीन मालक नाहीत. त्यामुळे, पंजाबने हरियाणा मॉडेल अवलंबले पाहिजे, ज्यानुसार एमएसपी देयकासाठी पिक लागवडीचा तपशील ग्राह्य धरला जातो, असे सरकारने म्हटले आहे. आतापर्यंत आधार कार्डच्या आधारे शेतक-यांना देयके दिली जात आहेत.

अमेरिकेत फेडेक्स सेंटरवर गोळीबार; ४ शीख बांधवांसह ८ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या