24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रशेवटी मुलीचा चेहराही पाहू दिला नाही

शेवटी मुलीचा चेहराही पाहू दिला नाही

एकमत ऑनलाईन

लखनौ : शेवटीदेखील आम्हाला आमच्या मुलीचा चेहरा पाहू दिला नाही, अधिकारी तुमच्या खात्यात किती पैसे आले हे तुम्हाला माहित आहे का? असे वारंवारर विचारत होते. मात्र आपल्याला न्याय हवा हवा आहे, अशा शब्दात हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईने माध्यमांसमोर व्यथा मांडली. या घटनेचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांमार्फत झाला पाहिजे, अशी मागणी केली.

हाथरस प्रकरणी वृत्तांकन करण्यासाठी माध्यमांना अटकाव केला जात होता. दोन दिवस यावरुन योगी सरकारवर ओरड झाल्यानंतर अखेर शनिवारी माध्यमांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी पीडीतेच्या आईने व्यथा मांडली. आम्हाला शेवटीही मुलीचा चेहरा बघू दिला नाही, असे त्या म्हणाल्या.

मायावतींकडून राजकारण : आठवले
आदित्यनाथ यांचा राजीनामा मागण्याचा मायावतींना काहीच अधिकार नसून, त्या केवळ राजकारण करीत आहेत अशी टीका आठवले यांनी केली.

राजकारणासाठी राहुल गांधी हाथरसमध्ये : ईराणी
ते(राहुल गांधी) पीडितेला न्याय देण्यासाठी नाही तर राजकारण करण्यासाठी हाथरसला जात आहेत, असे केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या.

कुटुंबाच्या नार्को चाचणीच्या स्थगितीसाठी याचिका
पीडितेच्या कुटुंबियांच्या नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीला स्थगितीसाठी अलाहाबाद हायकोर्टात मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी याचिका दाखल केली आहे.

माध्यमांची अडवणूक का? : राऊत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पुन्हा एकदा योगी सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेश सरकारने काहीच चुकीचे केले नाही तर, माध्यमांना तिथे जाण्यापासून का रोखले जात आहे? असा प्रश्न विचारला होता.

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या