24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयदेशात गेल्या २४ तासांत १,२०,५२९ नव्या बाधितांची नोंद

देशात गेल्या २४ तासांत १,२०,५२९ नव्या बाधितांची नोंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुस-या लाटेचा धोका अजूनही टळलेला नसला तरी ही लाट आता ओसरताना दिसत आहे. देशातल्या बरे होणा-या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने नव्या कोरोनाबाधितांपेक्षा जास्तच आहे. देशातला कोरोना मृत्यूदरही खालावताना दिसत आहे. मात्र तरीही देशवासियांनी काळजी घेण्याची आणि कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात एक लाख २० हजार ५२९ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे. तर देशात काल दिवसभरात एक लाख ९७ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.३८ टक्के झाला आहे.

देशात काल दिवसभरात ३,३८० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा आता तीन लाख ४४ हजार ८२ वर पोहोचला आहे. देशातला सध्याचा करोना मृत्यूदर १.२० टक्के आहे.

दुस-या लाटेत ६४३ डॉक्टरांचा बळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या