पाटणा : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपा आणि जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री असतील. तसेच हम आणि व्हीआयपीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, असे निश्चित झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावेही निश्चित झाली आहेत. नितीश कुमार हे आज संध्याकाळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. घटनात्मक तरतुदीनुसार २४३ सदस्य अशलेल्या बिहार विधानसभेमध्ये एकूण ३६ मंत्री बनू शकतात.
दरम्यान नितीश कुमारांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. याशिवाय भाजप नेते भूपेंद्र यादव, संजय जायस्वाल, नागेंद्र जी, जेडीयू नेते विजय कुमार चौधरी आणि आरसीपी सिंह ही मोठी नावं दिसणार आहेत.
नितीश कुमारांसोबत कोण कोण शपथ घेणार?
बिहार विधानसभेची सदस्य संख्या 243 असून मंत्रिमंडळात एकूण 36 मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो. पहिल्या टप्प्यात 16 मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. जेडीयूकडून बिजेंद्र यादव, अशोक चौधरी, विजय चौधरी, श्रवण कुमार आणि लेसी सिंह यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, प्रेम कुमार, नन्दकिशोर यादव, कृष्ण ऋषि, विजय सिन्हा, राणा रणधीर सिंह, प्रमोद कुमार, रामनारायण मंडल,नीतीश मिश्रा,नितिन नवीन, सम्राट चौधरी, संजीव चौरसिया यांची नावं आघाडीवर आहेत. याशिवाय विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश सहनी आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचे संतोष मांझी शपथ घेणार आहेत.
भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी?
बिहारमध्ये भाजपनं चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार मोदी यांना डच्चू देण्यात आलाय. भाजपने तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन उपमुपख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्यास रेणू देवी यांचं नाव आघाडीवर आहे.
प्रियकराचा प्रेयसीवर अॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू