23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयराजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा खदखद

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा खदखद

एकमत ऑनलाईन

जयपूर : उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांना पक्षात प्रवेश देऊन काल भाजपाने काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. दरम्यान, जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता राजस्थानमधील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसमध्ये घडमोडींना वेग आला आहे. तसेच पक्षात दीर्घकाळापासून नाराज असलेल्या सचिन पायलट यांच्या गोटात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहे.

पायलट यांच्या गटातील आठ आमदारांनी पायलट यांच्यासोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. या आमदारांमध्ये सचिन पायलट यांचे निकटवर्तीय रामनिवास गावडिया यांच्यासोबत विश्ववेंद्र सिंह, पी.आर. मीणा, मुकेश कुमार या नेत्यांच्या समावेश आहे. दरम्यान, या बैठकीमुळे सचिन पायलट हे भाजपामध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे.

दहा महिन्यांनंतरही काहीच निर्णय नाही
काही महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा नक्कीच झाली असावी, अशी शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सचिन पायलट यांनी मांडण्यात आलेल्या मुद्यांवर वाटाघाडी समितीकडून दहा महिन्यांनंतरही काही निर्णय न झाल्याने पायलट यांनी राजारी व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन पायलट हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहेत. सोबतच पक्षाच्या नेतृत्वाबाबतही ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोविड बॉण्डचा पर्याय फायदेशीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या