21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयदुस-या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाचाही बळी नाही

दुस-या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाचाही बळी नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूची कोणत्याही घटनेची नोंद केली गेलेली नाही अशी स्पष्टोक्ती केंद्र सरकारने मंगळवार दि़ २० जुलै रोजी राज्यसभेत दिली.

पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३,०९५ मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुस-या लाटेत ऑक्सिजनची मागणी ९,००० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राने राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यसभेत निवेदन देताना असे म्हटले की आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते.

आरोग्य हा राज्याचा विषय : पवार
दुस-या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड-१९ रूग्णांचा मृत्यू झाला का या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले. आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात.

केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सूचना
भारती पवार यांनी या संदर्भात लेखी उत्तर दिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही, असे म्हटले.

घरगुती वीज ग्राहकांना मोबाईलप्रमाणे प्रीपेड मीटरचा पर्याय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या