Tuesday, September 26, 2023

उत्तर प्रदेशात २५ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून जिवंत पेटवले

लखनौ: वृत्तसंस्था
प्रेम प्रकरणातून एका तरूणाला झाडाला बांधून जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. त्या तरूणाचे नाव अंबिका पटेल आहे. हा प्रकार आॅनर किंलिंगचा असल्याचा संशय पोलिसांचा आहे.

उत्तर प्रदेशमधील फतनपूर भागातील भुजौनी गावात सोमवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार अंबिका या व्यक्तीचे महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध होते. जमावाने तरूणाला जिवंत जाळल्यानंतर भुजौनी गावात मोठी हिंसा घडली. तब्बल तीन तास जमावाने गोंधळ घातला होता.

तरुणाच्या हत्येमुळे भडकलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. पोलिस आधिका-यासमोर जमावाने पाच गाड्या जाळल्या त्यात दोन पोलिस गाड्याचा समावेश होता. या हिंसाचारात घटनास्थळावर उपस्थित असणारे चार पोलीस जखमी झाले. पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, अंबिकाला झाडाला बांधून जाळण्यात आले होते. त्याची हत्या प्रेयसीच्या नातेवाइकांनीच केली असावी असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरुवात केली आहे. अंबिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Read More  पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह : वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर गुन्हा

अंबिका याचा मृतदेह भुजौनी गावातील एका आंब्याच्या बागेत सापडला होता. २५ वर्षीय अंबिका आणि एका तरूणीचे प्रेमसंबंध होते. ही तरूणी पोलिस दलात भरती झाली. दोघांनाही लग्न करायचे ठरवले होते. त्याच दरम्यान अंबिकाच्या प्रेयसीची इतर ठिकाणी बदली झाली. तरीही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. मुलीच्या घरच्यांना ही बाब मान्य नव्हती. अशातच अंबिकाने सोशल मीडियावर प्रेयसीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार करताच अंबिकाला तात्काळ अटक करण्यात आली होती. एक मे रोजी त्याची पॅरोलवर सुटका झाली. महिनाभरानंतर म्हणजे एक जून रोजी अंबिकाचा जाळून खून केला.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या