25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकेंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन केले. अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एसटी व्हिजन २०४७ सह विविध विषयासंबंधीच्या सत्रांचा समावेश असणार आहे. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनीही भाषण केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१ व्या शतकातील भारताच्या विकासात विज्ञान ही अशा ऊर्जेसारखी आहे. ज्यामध्ये प्रत्येक प्रदेशाच्या विकासाला, प्रत्येक राज्याच्या विकासाला गती देण्याची ताकद आहे.

आज जेव्हा भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा भारताचे विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पीएम मोदी म्हणाले की जेव्हा आपल्याला ज्ञान आणि विज्ञानाची ओळख होते, तेव्हा जगातील सर्व संकटांपासून मुक्तीचा मार्ग आपोआप उघडतो. विज्ञान हा उपाय आणि नवनिर्मितीचा आधार आहे. याच प्रेरणेने आजचा नवा भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान तसेच जय अनुसंधान हाक देत पुढे जात आहे.

पीएम मोदी म्हणाले की, गेल्या शतकातील सुरुवातीची दशके लक्षात ठेवली तर जग कशाप्रकारे विध्वंस आणि शोकांतिकेच्या काळातून जात होते हे आपल्याला दिसून येते. पण त्या काळातही पूर्व असो वा पश्चिम, सर्वत्र शास्त्रज्ञ त्यांच्या महान शोधात गुंतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाश्चिमात्य देशातील आइन्स्टाईन, फर्मी, मॅक्स प्लँक, नील्स बोहर, टेस्ला यांसारखे शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगांनी जगाला चकित करत होते. याच काळात सीव्ही रमण, जगदीश चंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा, एस चंद्रशेखर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ आपले नवीन शोध समोर आणत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या