22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयतरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘क्रॅश कोर्स’चे उद्घाटन

तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘क्रॅश कोर्स’चे उद्घाटन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना यो्द्ध्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स लाँच केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ राज्यांमध्ये १११ केंद्र उघडले जाणार आहेत. देशभरातील एक लाख कोरोना योद्ध्यांची कौशल्य अधिक विकसित केले जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी देशाला संबोधित केले.

देशाची लोकसंख्या पाहता आरोग्य व्यवस्था, कर्मचारी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नवीन वैद्यकीय विद्यालये यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच, वैद्यकीय शिक्षण वाढवण्याची गरज आहे. कोरोनाशी लढण्यासाठी तयार राहायला हवे. कोरोना प्रत्येकवेळी आपले रुप बदलत आहे़ नव्या कोर्समधून २ ते ३ महिने प्रशिक्षण दिले जाईल, असे मोदींनी सांगितले. एक लाख योद्ध्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोरोना योद्ध्यांना नव्या गोष्टी शिकायला मिळतील. देशात स्किल इंडिया मिशनला सुरुवात करण्यात आली आहे, असे मोदी म्हणाले.

कोरोना योध्दांना संकटकाळासाठी तयार करणार
कोरोना योद्ध्यांना सहा कस्टमाइज्ड जॉबसाठी तयार केले जाईल. यामध्ये होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, एडवांस्ड केअर सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट, सॅम्पल कलेक्शन सपोर्ट आणि मेडीकल इक्विपमेंट सपोर्ट यांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाअंतर्गत लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

इंधनदर न वाढणे ब्रेकिंग न्यूज – राहुल गांधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या