26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home राष्ट्रीय यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

एकमत ऑनलाईन

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्याची प्रकरणे बाहेर येत आहेत.

बलरामपूर, उत्तर प्रदेश
हाथरसच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दलित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली व त्यानंतर तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

बुलंदशहर, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, शेजार्‍याने अंमली पदार्थांचा वास घेऊन तिच्यावर बलात्कार केला. घटनेपासून आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपानुसार ती झोपली असताना शेजारच्या भागात राहणारा एक तरुण घरात आला आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती केली.

आजमगड, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या आजमगडमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीला घृणास्पद वागणूक दिली. आरोपी युवकाला आता अटक करण्यात आली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. असा आरोप आहे कि लहान मुलगी तिच्या गल्लीमध्ये खेळात असताना युवकाने तिला फूस लावून त्याच्यासोबत नेले व तिच्यावर बलात्कार केला .

खरगौन, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील खरगोन येथे शेताची देखभाल करण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपीने पीडितेच्या भावावर काठीने वार करून त्यास जखमी केले व त्यानंतर सदरील मुलीवर बलात्कार केल्याची घटना आहे. सध्या या प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार आहेत, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खरगोनमधील झिरन्या पोलिस स्टेशन परिसरातील मारुगड गावची ही घटना आहे.

सवाई माधोपूर, राजस्थान
राजस्थानच्या सवाई माधोपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. परंतु अद्याप संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, या संपूर्ण प्रकरणात काही स्थानिक नेत्यांचीही नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.

बारान, राजस्थान
राजस्थानच्या बारानमध्ये दोन महिलांनी दोन तरुणांवर बलात्काराचा आरोप केला आहे. मुलींच्या वतीने असा आरोप केला जात आहे की, तरुणांनी त्यांना फूस लावून वेगवेगळ्या शहरात नेले व तेथे त्यांच्यावर बलात्कार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु पोलिसांच्या माहितीप्रमाणे सदरील तरुणी सहमतीने तरुणांसोबत जाण्याचे मान्य केले होते.

अजमेर, राजस्थान
राजस्थानमधील अजमेर येथे काही मित्रांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण आहे. ही घटना अजमेरमधील रामगंजची आहे, तिथे पीडितेने आरोप केला आहे की, एका युवकाने तिला शेतात नेले होते तिथे मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

आटापिटा लसीच्या यशासाठी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या