23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयरुग्णालयात रोख देणा-यांवर ‘आयकर’ची नजर

रुग्णालयात रोख देणा-यांवर ‘आयकर’ची नजर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आता आयकर विभागाची रूग्णालय, समारंभ हॉल येथील कॅश व्यवहारांवर करडी नजर असणार आहे. अनेक रूग्णालये रूग्णांकडून पॅन कार्ड घेत नसल्याचे आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच आयकर विभागाच्या अधिका-यांनी अलवर, कोटा, जालना सारख्या छोट्या शहरातून मोठ्या प्रमाणावर कॅश जप्त केली होती.

अनेक छोट्या शहरात आयकर विभागाची पोहच कमी असते असा समज आहे. त्यामुळे या शहरात आर्थिक गुन्हे घडत आहेत. त्यामुळेच आयकर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात काही विशिष्ट व्यवसायांमधील कॅश व्यवहारावर नजर ठेवणार असल्याचे सांगितले. आयकर विभागातील अधिका-यांनी सांगितले की कायद्याने मोठ्या रक्कमेचे कॅश व्यवहार करताना पॅन क्रमांक देणे बंधनकारक आहे. मात्र अनेक रूग्णालयात या नियामकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे आता आयकर विभाग अशा रूग्णालयांवर कारवाई करणार आहे. याचबरोबर रूग्णालयातून उपलब्ध होणा-या माहितीचा आधार घेत असे मोठे कॅश व्यवहार करणा-या रूग्णांचा देखील माग काढला जाणार आहे. दरम्यान, आयकर विभागाच्या या कारवाईवर काही रूग्णालयांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते अशा प्रकारे प्रत्येक वेळेस रूग्णांकडून पॅन क्रमांक मिळणे शक्य नाही. विशेषकरून आपात्कालिक विभागातील रूग्णांकडून पॅन क्रमांक मिळणे अवघड आहे.

समारंभ हॉलवरही कारवाई करणार
आयकर विभागाने अशाच प्रकारची कारवाई समारंभ हॉलवर देखील करणार असल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारचे मोठे कॅश व्यवहार असे समारंभ हॉल आपल्या अकाऊंटमध्ये दाखवत नसल्याचे आढळून आले आहे. याचबरोबर उंची घड्याळे विकणा-यांवरही आयकर विभागाची करडी नजर असणार आहे.

विशिष्ठ व्यावसायांवर लक्ष
आयकर विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की अशा काही विशिष्ठ व्यवसायांवर आमची नजर आहे. जर आम्हाला ठोस पुरावे मिळाले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. गेल्या काही महिन्यात अशा लोकांवर, व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्व व्यवसाय आणि व्यावसायिकांची चौकशी करणार आहोत.

सर्वांची माहिती आयकरविभागाकडे
आयकर विभागाकडे कोणावर कारवाई करायची आहे याची सगळी माहिती आहे. सध्या वार्षिक माहिती पत्रकाद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करून ही माहिती आयकर रिटर्न्समध्ये दाखविण्यात आली आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या