नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करणार आहे.
सरकारकडून महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. पाच टक्क्यांची वाढ झाल्यास पगारात जवळपास ३४००० रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात होणारी वाढ ही ऑल इंडिया कन्झ्यूमर प्राईजच्या आकडेवारीने होते. केंद्रीय कर्मचा-यांना किती महागाईचा भत्ता दिला जावा याचा निर्णय घेतला जातो.
मार्च २०२२ पासून महागाईत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचा-यांना पाच टक्के महागाई भत्ता वाढवून मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ केल्यास केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता ३९ टक्के इतका होणार. केंद्र सरकाकडून दरवर्षी दोन वेळेस महागाई भत्त्यात वाढ केली जाते. साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते.