23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeराष्ट्रीयभात, बाजरीच्या एमएसपीत वाढ

भात, बाजरीच्या एमएसपीत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मोदी सरकारने खरीप हंगामापूर्वी शेतक-यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. त्यानुसार भातावरील एमएसपीमध्ये ७२ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे भाताचा दर आता १९४० प्रतिक्विंटल झाला. यासोबत बाजरी, उडीद, तूर डाळ, तिळाच्या एमएसपीतही वाढ केली आहे.

यासोबतच बाजरीला आता प्रतिक्विंटल २१५० ऐवजी २२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे, तर त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला ३०० रुपये प्रतिक्विंटल तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ तिळाला देण्यात आली. तिळाचे भाव ४५२ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले. गेल्या ७ वर्षात केंद्र सरकारने शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. एमएसपी २०१८ पासून किंमतीवर ५०% परतावा जोडून घोषित केले जाते.

तोमर म्हणाले की, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर गतवर्षीच्या तुलनेत भाताचा किमान आधारभूत दर ७२ रुपये वाढून १९४० रुपयांवर आला आहे. मागील वर्षी ही रक्कम प्रतिक्विंटल १८६८ रुपये होती. चालू खरीप हंगामासाठी (केएमएस) २०२०-२१ (६ जून २०२१ पर्यंत) गेल्या वर्षीच्या ७३६.३६ एलएमटीच्या तुलनेत एमएसपीवर ८१३.११ एलएमटीपेक्षा जास्त धान्य येथे खरेदी केले गेले. त्यामुळे १२० लाखपेक्षा अधिक शेतक-यांना फायदा झाला आहे.

नव्या कायद्याबाबत चर्चेची तयारी
देशातील सर्व पक्षांना कृषि कायदा आणायचा आहे. परंतु त्यांची हिंमत होऊ शकली नाही. भारत सरकारने ११ वेळा शेतक-यांशी संवाद साधला. परंतु कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतील, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असू, असेही केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

लातूर जिल्ह्यातील ५६६ अंगणवाडया बनल्या हॅपी होम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या