22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा चढ-उतार सुरूच आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,१२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान १७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला, जो कालच्या तुलनेत १४ ने कमी आहे.

काल ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र, गेल्या २४ तासांत १,९७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १४,९७१वर पोहोचली आहे. दुसरीकडे, एकूण संसर्ग दर ०.४६ टक्के झाला आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ५२,४,५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत पुन्हा कोरोनाची दहशत
गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे ४१८ रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, दिल्लीत संसर्ग दर २.२७ टक्के नोंदवला गेला. मात्र, या कालावधीत ३९४ रुग्ण बरेही झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे ३३८ नवे रुग्ण
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३३८ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ७८,८३,३४८ झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या