24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeउद्योगजगतअर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी खर्च वाढवा

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी खर्च वाढवा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: कोरोनासंकटानंतर मंदीत आलेल्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी खर्च वाढवा, असा सल्ला अर्थतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. तसेच सार्वजनिक उपक्रमांमधील गुंतवणूक काढून घेऊन खासगीकरण करण्याचा वेगही वाढवा, असेही त्यांनी म्हटले आहे. देशाच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महत्त्वाच्या अर्थतज्ज्ञांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी तज्ज्ञांनी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात राजकोषीय तूट कमी करण्यासाठी सरकारने उदार धोरण अवलंबले पाहिजे, असा सल्लाही मोदींना दिला. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी निर्यात वाढवण्याचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी धोरणे आखण्याचाही आग्रह केल्याचे सांगण्यात येत आहे.

खासगीकरणासाठी मंत्रालय स्थापन करा
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्याची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थी न्यायालयातील निर्णयासारख्या गोष्टींपासून सरकारने दूर राहायला हवे, असंही अर्थतज्ज्ञांनी मोदींना सांगितले. कोणत्याही प्रकारच्या सुधारणा न करताही गुंतवणूकदार अजूनही भारतात गुंतवणूक करत असल्याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

करांची सरासरी वाढवा
बैठकीत देशाच्या जीडीपीच्या बरोबरीने करांची सरासरी वाढवण्यावरही भर देण्यात आला. यंदा करांची सरासरी २००८ पेक्षा कमी राहिली आहे. सरकारने आयात शुल्क वाढवले पाहिजे. तसेच बँकांचे पुनरुज्जीवन करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला काही अर्थतज्ज्ञांनी दिला तर काहींनी वेळ पडल्यास सरकारी उपक्रमांचे खासगीकरण करण्यासाठी आणि मालमत्तेची विक्री करण्यासाठी नवे मंत्रालय निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

बैठकीला अरविंद पगढिया, के. व्ही. कामत, राकेश मोहन, शंकर आचार्य, शेखर शाह, अरविंद विरमानी आणि अशोक लाहिडी आदी अर्थतज्ज्ञ तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, योजना राज्यमंत्री इंद्रजीत सिंह, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आदी उपस्थित होते.

शत्रूच्या हल्ल्यापेक्षाही आत्महत्यांमुळे अधिक सैनिकांचे मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या